रमानगर भागात एका 20 वर्षीय विवाहितेवर घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत असा सातत्याने दबाव टाकत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 23 एप्रिल 2024 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत हा छळ सुरू असल्याचे तिच्या फिर्यादीत नमूद आहे.फिर्यादीनुसार, पती विजय गंगावणे याच्यासह सासू संगीता गंगावणे, सासरे विजय गंगावणे, नणंद आम्रपाली दाणे, दीपाली बनकर, रुपाली मोकळे आणि सुजाता (सर्व रमानगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी सतत वाद घालत तिला अपमानित केले.
advertisement
‘तू काळी आहेस’ अशा अवमानास्पद शब्दांत तिची निंदानालस्ती करणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असा त्रास तिला वारंवार सहन करावा लागला. लग्नावेळी 50 हजार रुपये स्वीकारूनही सासरकडून पुन्हा तीन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचेही तिने तक्रारीत सांगितले. पैसे आणण्यास नकार दिल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार फिरंगे करीत आहेत.
