गयाबाई वाघ या घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या स्वयंपाक करत असताना गॅस शेगडी पेटवताच अचानक जोरदार भडका उडाला. या आगीत त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेत गयाबाईंना खासगी वाहनातून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे धोंदलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गयाबाई यांच्या पश्चात भाऊ, तीन बहिणी, भाचे असा परिवार असून या अपघाताने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घरगुती गॅस वापरताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून अशा घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहनही यानिमित्ताने ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
advertisement
