वडिलोत्पार्जित म्हशींच्या माध्यमातून दररोज 60 लिटर दूध काढले जाते, त्याची विक्री केली जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 70 ते 75 हजार रुपयांची कमाई होत असल्याचे एजास शेखने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. करमाड येथे म्हैस पालनाचा व्यवसाय एजास शेख गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. म्हशींना खाण्यासाठी चारा आणि मक्काचा मुरघास तसेच सकाळ- संध्याकाळ वैरण असते. याबरोबरच सर्की ढेप व सुग्रास या जनावरांना खाण्यासाठी दिली जाते. म्हशींचे सर्व खाद्य विकत घेऊन त्याचे नियोजन केले जाते.
advertisement
म्हैस पालन व्यवसाय करण्यासाठी काय करावे?
म्हैस पालन आणि दुग्ध व्यवसाय करायचा झाल्यास त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची तयारी असायला हवी. तेवढी स्वतःमध्ये हिंम्मत असायला पाहिजे की, व्यवसाय आपण करू शकतो. कारण की, या व्यवसायामध्ये दूध काढणे, चारा- पाणी करणे, गोठा साफ करणे अशी सर्व कामे स्वतःला आली पाहिजे. त्या व्यवसायामध्ये कामगार टिकत नसल्याचे देखील शेख यांनी म्हटले आहे.
म्हैस पालनाचा व्यवसाय का करावा?
इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून हा व्यवसाय केला तर उत्कृष्ट काम आहे. तसेच दुसऱ्यांकडून किती दिवस पगार घ्यायचा आपण देखील कधीतरी इतरांना रोजगार दिला पाहिजे. त्यांना पगार दिला पाहिजे असे आवाहन देखील एजास शेखने तरुणांना केले आहे.