मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने कबुतरखान्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. परंतु महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट समाजाच्या मतांसाठी लगोलग कबुतरखाने बंद न करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेतल्याचेही बोलले जाते.
कबुतरं म्हणजे काय शिंदेंचे आमदार नाहीत कंट्रोल फिडींग करायला-आदित्य ठाकरे
advertisement
कबुतरं म्हणजे काय शिंदेंचे आमदार आहेत काय कंट्रोल फिडींग करायला, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावून वरळी सी फेसला पालकमंत्री लोढा हे बंगला बांधतायेत. तिथे कबुतरांची चांगली व्यवस्था होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले. तसेच पालकमंत्री असूनही कबुतरखान्याबाबत मुंबई महानगरपालिकेला ते पत्र देतात हे अतिशय धक्कादायक आहे. स्थानिकांच्या भावनेसोबत आम्ही आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नसल्याची भूमिका घेतली. कबुतरखाने अचानक बंद करण्याऐवजी कबुतरांना कोणत्या वेळेत खाणे द्यावे आणि कोणत्या वेळेत देऊ नये, असा नियम तयार करता येईल. यासंदर्भात विविध उपाययोजना पडताळून पाहिल्या जातील, असे फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री असूनही पत्र लिहिणे धक्कादायक
कबुतरखान्याच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. कबुतरखान्याबाबत पालकमंत्री असूनही मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहिणे हे धक्कादायक आहे. स्थानिकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, असे आदित्य म्हणाले. तसेच, लोढा वरळी सी-फेसवर बंगला बांधत आहेत, तिथे कबुतरांसाठी चांगली व्यवस्था होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
टॉवर्समधील घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम लवकर घ्यावा
बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यावरून सध्या सत्ताधारी पक्षात श्रेयवादाची लढाई सुरु असल्याची टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. म्हाडासोबत नियमित बैठकिसाठी आदित्य ठाकरे वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयात उपस्थिती होते. टॉवर्समधील घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम लवकरच घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. आगामी गणेशोत्सव रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरातच साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मंत्रिमंडळात काही मंत्र्यांमध्ये या प्रकल्पाच्या श्रेयवादावरून मतभेद आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.