कोकणात अलर्ट राहण्याच्या सूचना
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी दोन जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांसह गडगडाटासह 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे विकेण्डला कामाशिवाय घराबाहेर पडू नका, लाँग विकेण्डचा प्लॅन असेल तर जरा जपून कारण पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे.
advertisement
मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर वाढणार
गेल्या काही दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अनुभव घेतलेल्या मुंबई आणि ठाण्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार असल्याने मुंबईकरांनी वेळेचं नियोजन करू घराबाहेर पडावं असं आवाहन केलं आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथा भागांना १६ ऑगस्ट रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात काय स्थिती?
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत १३ व १४ ऑगस्ट रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पुढील काही दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
