हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात ऑरेंज अलर्ट दिला असून मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार अशी शक्यता वर्तवली आहे.
तसेच राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं. पुढचे तीन दिवस धो धो पाऊस राहणार आहे.
advertisement
मात्र तरीही पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला असून मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीकाच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी देखील गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज ॲलर्ट. जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाची संततधार कायम आहे. धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सोलापुरात पावसानं थैमान घातलं आहे. सीना नदीला महापूर येण्याची शक्यता आहे..या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे. पुरामुळे फटका बसलेल्या घरमालकांना बुधवारपर्यंत दहा हजार रुपयांची मदत जमा होणार आहे. तर सीना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या पंचनाम्याना आजपासून सुरुवात होणार आहे.