महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तसेच शेजारील पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये थंडीचा तीव्र परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमान 5 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. तर विदर्भात 7-8 अंशांवर तापमान आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये शीत लहरीची स्थिती कायम राहील. याचा अर्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान लक्षणीयरीत्या खाली घसरण्याची शक्यता आहे.
advertisement
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, निफाड, अहिल्यानगर इथे तापमान 4 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे हाडं गोठवणारी थंडी वाढल्याने लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत. उत्तरेकडील शीत लहर कायम असल्याने महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम राहणार आहे. ला निनामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिना सर्वात जास्त थंडी राहणार आहे.
७ दिवस कसा राहील तापमानाचा अंदाज
राज्यात थंडीची स्थिती असताना, आगामी दिवसांमध्ये तापमानात काही चढ-उतार पाहायला मिळतील. पुढचे 48 तास महाराष्ट्रातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही, म्हणजेच थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर पुढील तीन दिवसांसाठी किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळेल.
मागच्या २४ तासांत महाराष्ट्रातील विदर्भ भागात कोल्ड वेवची नोंद करण्यात आली. पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यांमध्येही थंडीची लाट दिसून आली आहे. ही स्थिती मध्य भारत आणि उत्तर प्रायद्वीपीय भारतात १४ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.
