आंबेगाव जुन्नरचे प्रांत कार्यालय असणाऱ्या मंचर येथे प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांनी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने शुक्रवारी (२७ मार्च रंगहात पकडले.
सापळा रचून प्रांताधिकाऱ्यांना बेड्या
मंचर प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आलीय. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक राहुल खैरनार यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून मंचर पोलिसांत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात नारायणगाव येथील एका बिल्डरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
advertisement
प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कुठल्या कारणासाठी लाच स्वीकारली याबाबत अद्याप स्पष्टता नसून मंचर पोलिसांत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
प्रकरण नेमके काय?
इमारतीच्या बांधकाम पूर्णत्व दाखल्यासाठी तक्रारदाराने प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी शिंदे यांनी २ लाखांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने शुक्रवारी मंचर येथील प्रांत कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेतले.
