शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशानंतर बोलताना त्यांनी राजकारणात येण्यामागचं आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याचं कारणही सांगितलं. किरण माने म्हणाले की, मी एक सामान्य कलाकार आहे. परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारा माणूस आहे. मी राजकीय भूमिका का घेतली असा प्रश्न विचारला जातोय. तर सध्या संविधान वाचवण्याची आणि लोकशाही वाचवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात आहे. पक्षात मला जी जबाबदारी मिळेल ती मनापासून पार पाडेन असंही किरण माने यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर लिहिली होती पोस्ट
शिंदे गटाने बंड केल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, एकाही नेत्याकडं नसल अशी गोष्ट तुमच्याकडं आहे ती म्हणजे तुमचे निष्ठावान कार्यकर्ते. गाळ बाजूला गेला आणि आता शंभर टक्के प्युअर असलेला माणूस तुमच्यासोबत आहे. तुम्हाला राखेतून झेप घ्यायचीय.
अभिनेते किरण माने आतापर्यंत अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. मराठी टीव्ही मालिकेतील कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मालिकेतून काढून टाकलं होतं. यावेळी त्यांना काही कलाकारांनी पाठिंबाही दिला होता. दरम्यान, किरण माने यांनी सोशल मीडियावर आपण मांडत असलेल्या भूमिकेमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकलं असा प्रत्यारोप केला होता.