खरं तर वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे.या मतदार संघात दरवर्षी कोळीवाड्यातील नागरीक नारळी पोर्णिमा सण साजरी करतात.या सणाला आदित्य ठाकरे आवर्जुन हजेरी लावतात. पण आज आदित्य ठाकरे यांच्या आधी एकनाथ शिंदे यांनी एंन्ट्री मारली होती. त्यामुळे एकप्रकारे शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या आधी वरळीत पोहोचून त्यांना एकप्रकारचा शह दिला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यात एंन्ट्री झाली होती.
advertisement
दरम्यान दोन्ही नेते वरळी कोळीवाड्यात पोहोचल्यानंतर आमने सामने आले होते. यावेळी काही मिनिटांसाठी वरळीत तणावाचे वातावरण होते. दोन्ही नेते आमने सामने आल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर फारसे काही हावभाव नव्हते. पण नंतर आदित्य ठाकरे हे खून्नस देताना दिसल्याची माहिती सुत्रांकडूम मिळतेय. या दरम्यान कार्यकर्ते घोषणाबाजी देताना भिडल्याची माहिती आहे.
दरम्यान यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, वरळी कोळीवाड्यात येऊन मला खूप आनंद झाला. कारण मला माझ्या कोळी लाडक्या बहिणी भेटल्या आणि कोळी लाडके भाऊ देखील भेटले ,असे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात तुम्ही आलात? असे विचारले असता, मला माझ्या लाडक्या बहिणींनी बोलावलं म्हणून त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी आलो. मला येथे सणासाठी बोलवालं म्हणून आलो,असे म्हणत त्यांनी राजकीय प्रश्नांवर उत्तर देणं टाळलं. लोकांच्या सोबत आपण काम केलं पाहिजे, लोकाच्या सणात सहभागी झालं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे,असे म्हणत शिंदे यांनी पुढे आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला.
आदित्य ठाकरे यावर म्हणाले, मी गडबड काय चालली आहे? हे बघत होतो.मी कोळीवाड्याला आल्यावर मला प्रचंड आनंद होतो.तोच आनंद आज होतोय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळी एंन्ट्रीवर प्रश्न विचारताच त्यांना जास्त महत्व द्यायची गरज नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली.