TRENDING:

...अन् एका सेकंदात सगळं संपलं, नगरमध्ये दोघांचा जागीच मृत्यू, धडकी भरवणारा CCTV VIDEO

Last Updated:

Accident in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. करंजी येथील अपूर्वा पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्कॉर्पिओ आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
News18
News18
advertisement

दोन मित्रांचा करुण अंत

या भीषण अपघातात मृत्यू झालेले दोन्ही तरुण त्रिभुवनवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून करंजीच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

advertisement

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

हा संपूर्ण अपघात अपूर्वा पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचे धक्कादायक फुटेज आता समोर आले असून, त्यामध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्हिडीओत संबंधित दुचाकी एका कारला ओव्हरटेक करताना दिसत आहे. पण संबंधित कारचा वेग जास्त असल्याने ही दुचाकी कारला ओव्हरटेक करू शकली नाही. याच वेळी समोरून स्कॉर्पिओ आली आणि दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे त्रिभुवनवाडी आणि करंजी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...अन् एका सेकंदात सगळं संपलं, नगरमध्ये दोघांचा जागीच मृत्यू, धडकी भरवणारा CCTV VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल