TRENDING:

कित्येक वेळा विनंती, अनेकदा पत्रव्यवहार पण प्रशासन ऐकेना, नीलेश लंके उपोषणाला बसले

Last Updated:

Nilesh Lanke: जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम इशारा खासदार नीलेश लंके यांनी प्रशासनाला दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या १६० राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामात प्रचंड दिरंगाई होत असून, या कामास सुरुवात करावी या मागणीसाठी खासदार नीलेश लंके आज शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
निलेश लंके (खासदार)
निलेश लंके (खासदार)
advertisement

निशाना लगाया तो शिकार होना ही चाहिये... अशा शब्दात खासदार डॉ. निलेश लंके यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे. नगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी न्याय मिळावा यासाठी लंके यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण सुरू करण्यात आले.

या रस्त्यावरील खड्डे, उखडलेले डांबर, अपूर्ण डांबरीकरण, आणि निकृष्ट जलनिचरा व्यवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांसह वाहनचालकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, काही नागरिकांनी जीवही गमावले आहेत. वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे आता खासदार लंके यांनी थेट मैदानात उतरत उपोषणाचा निर्णय घेतला.

advertisement

कित्येक वेळा विनंती, अनेकदा पत्रव्यवहार पण प्रशासन ऐकेना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम इशारा खासदार नीलेश लंके यांनी प्रशासनाला दिला आहे. सावळीविहीर ते अहमदनगर बायपास या ७५ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणासाठी भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीस काम मंजूर होऊनही आज अखेर कोणतेही काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. अनेकदा विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने खासदार लंके यांनी उपोषणाचा पर्याय स्वीकारला आहे. यापूर्वी आमदार असताना लंके यांनी नगर-पाथर्डी व नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कित्येक वेळा विनंती, अनेकदा पत्रव्यवहार पण प्रशासन ऐकेना, नीलेश लंके उपोषणाला बसले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल