रिक्षा पकडली अन् खर्डा रोडवर गेली
दीपाली गुरूवारी सकाळी आपल्या मैत्रिणींना मी बाजारात जाऊन येते असं सांगून बाहेर पडली. 33 वर्षीय नृत्यांगणा दीपाली गोकुळ पाटील जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होती. सर्वांना वाटलं की, ती कलाकेंद्रात गेली. पण तिने घराबाहेर गेल्यावर ऑटो पकडली अन् खर्डा रोडवर गेली. तिथं ती हॉटेल साई लॉज गेली. 5 तासांपासून दिपालीचा काही पत्ता लागेना म्हणून तिच्या मैत्रिणींना तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी काहीही संपर्क होऊ शकला नाही.
advertisement
मैत्रिणींना हाका मारल्या पण...
मैत्रिणींना जेव्हा रिक्षावाल्याशी विचारपूस केली तेव्हा एका रिक्षाचालकाने तिला हॉटेल साई लॉजला सोडल्याचं सांगितलं. लगबघीने तिच्या मैत्रिणी 5.30 च्या सुमारास त्या लॉजवर गेल्या. त्या तिच्या रूमच्या दिशेने गेल्या असता त्यांना रूम आतून लॉक असल्याचं आढळलं. मैत्रिणींना हाका मारल्या पण काहीच प्रतिसाद आतून आला नाही. त्यानंतर लॉज चालकाला विनंती केल्यानंतर डुप्लिकेट चावीने रुम उघडली. आत पाहतो तर काय, दिपाली पंख्याला लटकली होती. तिच्या मैत्रिणींच्या पायाखालची जमीनच सरकली.
जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी तिची मैत्रिण हर्षदा रवींद्र कामठे हिच्या तक्रारीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ती मूळची ठाणे जिल्ह्यातील कल्याणची होती. पण सध्या ती आपल्या एका मैत्रिणीसोबत जामखेडच्या तपनेश्वर भागात भाड्याने राहत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता.
दरम्यान, कर्जत जामखेड चे आमदार आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
