हल्लेखोर कोण होते?
नाश्टा केल्यानंतर नांदूरकडे निघाल्यानंतर काही तरुण त्याठिकाणी आले अन् त्यांना हाके यांच्या गाडीवर हल्ला केला. मात्र, या हल्ल्ल्यात हाके यांना कोणतीही दुखापत झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे? हल्लेखोर कोण होते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करणार
advertisement
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची नुकतीच केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून, ते आंदोलन पुढे नेणार की मागे घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही, अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्ही परखड भूमिका घेत आहोत. कुठलीही राजकीय भूमिका घेण्यापेक्षा सगळे पक्ष विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. याबाबतीत कुणी राजकारण करत असेल, कोण कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत असेल, आणि आमच्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांवरती हल्ले होणार असतील तर त्या उदविग्न भावनेतून मी चळवळ थांबवण्याची ती पोस्ट लिहिली होती. आज मी पाथर्डीमध्ये जात आहे वेगवेगळ्या समाजातील लोकांशी संवाद तिथे साधणार आहे लोक मला बोलवत आहेत मी लोकांना बोलवत नाही तेवढी माझी कॅपॅसिटी नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.