TRENDING:

हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला, पत्नीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम; नेमकं काय झालं?

Last Updated:

समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अहमदनगरमधील रासने नगर परिसरात ही घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, 9 ऑक्टोबर : अहमदनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अहमदनगरमधील रासने नगर परिसरात ही घटना घडली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. याबाबत त्यांची पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. हेरंब कुलकर्णी हे शाळेतून घरी परत येत असताना हा हल्ला झाला आहे. याबाबत प्रतिमा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली.
News18
News18
advertisement

     प्रतिमा कुलकर्णी यांची पोस्ट  

'मी प्रतिमा कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांची पत्नी आहे

माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.

advertisement

त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.

सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.

advertisement

आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे...

सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे.

*प्रतिमा कुलकर्णी*'

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला, पत्नीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम; नेमकं काय झालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल