गिरीश महाजन हे साडे अकराच्या सुमारास चौंडी इथं पोहोचणार आहेत. याआधीही गिरीश महाजन चौंडी इथं गेले होते. मात्र त्यांची मध्यस्थी यशस्वी झाली नव्हती. मुंबईत झालेल्या धनगर आरक्षणाबाबतच्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे धनगर समाज बांधवांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता. आण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडर यांचा उपोषणाचा २१ वा दिवस असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. आज तरी धनगर आरक्षणावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 26, 2023 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर तोडगा निघणार? गिरीश महाजन दुसऱ्यांदा चौंडीला जाणार
