TRENDING:

भगवान गडाचा उत्तराधिकारी ठरला, नामदेव शास्त्रींची मोठी घोषणा

Last Updated:

भगवान गडाचे चौथे उत्तराधिकारी ठरले आहेत, महंत नामदेव शास्त्रींनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे भगवान गडाचा पुढचा उत्तराधिकारी ठरला आहे. याबाबत महंत नामदेव शास्त्रींनी घोषणा केली आहे. भगवान गडाचे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा शास्त्री यांच्या नावाची नामदेव शास्त्री यांनी घोषणा केली. कृष्णा शास्त्री हे भगवान गडाचे चौथे उत्तराधिकारी आहेत.
News18
News18
advertisement

श्रीक्षेत्र भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. गडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी ही घोषणा केली. नवनियुक्त महंतांना एकनाथवाडीवरून रथात बसवून ढोल-ताशा, टाळ-मृदंग बाबांचा जयघोष करत भाविकांनी गडावर आणले. भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माउली मंदिराचे काम सुरू आहे. दोन वर्षांनंतर ते काम पूर्ण होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या वर्षी भगवान गडाचा अमृतमहोत्सव असून, या वेळी कृष्णा महाराज यांना गादीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.

advertisement

कोण आहेत कृष्णा शास्त्री?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

कृष्णा महाराज शास्त्री यांचं गाव तेलंगणात आहे. तेथे महंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची भेट झाली होती. बारा वर्षांपूर्वी ते गडावर आले होते. ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात झाले आहे, नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांचा अभ्यास पूर्ण केला आहे. कृष्णा शास्त्री यांनी तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थान या ठिकाणी महंत म्हणून कार्यभार स्विकारला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
भगवान गडाचा उत्तराधिकारी ठरला, नामदेव शास्त्रींची मोठी घोषणा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल