कोण आहेत कृष्णा शास्त्री?
कृष्णा महाराज शास्त्री यांचं गाव तेलंगणात आहे. तेथे महंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची भेट झाली होती. बारा वर्षांपूर्वी ते गडावर आले होते. ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात झाले आहे, नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांचा अभ्यास पूर्ण केला आहे. कृष्णा शास्त्री यांनी तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थान या ठिकाणी महंत म्हणून कार्यभार स्विकारला आहे.
advertisement
दरम्यान श्रीक्षेत्र भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. गडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी ही घोषणा केली. उत्तराधिकारी म्हणून घोषणा होताच कृष्णा महाराज शास्त्री यांना एकनाथवाडीवरून रथात बसवून ढोल-ताशा, टाळ-मृदंग बाबांचा जयघोष करत भाविकांनी गडावर आणले. भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माउली मंदिराचे काम सुरू आहे. दोन वर्षांनंतर ते काम पूर्ण होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या वर्षी भगवान गडाचा अमृतमहोत्सव असून, या वेळी कृष्णा महाराज यांना गादीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.