TRENDING:

भरधाव आयशरने 3 जणांना चिरडले, जळगावमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Last Updated:

अमळनेर हेडावे नाका येथे आयशर ट्रकच्या अपघातात विश्वनाथ हिम्मत भिल्ल आणि ज्योत्स्नाबाई विश्वनाथ भिल्ल ठार, बाळू साहेबराव पाटील गंभीर जखमी. परिसरात हळहळ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. हेडावे नाका परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका आयशर ट्रकने मोटरसायकलला धडक देत तिघांना चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
News18
News18
advertisement

हा अपघात अमळनेरच्या हेडावे रस्त्यावर रात्री उशिरा घडला. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीररित्या जखमी झाले. या दुर्घटनेत एकरुखी येथील रहिवासी असलेले विश्वनाथ हिम्मत भिल्ल आणि ज्योत्स्नाबाई विश्वनाथ भिल्ल यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात बाळू साहेबराव पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तिघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले.

advertisement

जखमी बाळू पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भरधाव आयशरने 3 जणांना चिरडले, जळगावमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल