नवरात्रीत स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते. त्यामुळे मनुष्य भीतीवर मात करून विवेकबुद्धीने जीवनाचे निर्णय घेऊ शकतो. यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल 18 सोबत संवाद साधताना सांगितले.
देवीचे स्वरूप
स्कंदमाता चतुर्भुज आहे. त्यांच्या हातांमध्ये कमळ आहे, तर कुमार कार्तिकेय त्यांच्या मांडीवर विराजमान आहेत. त्यांचे वाहन सिंह असून त्या सौरमंडळाची अधिष्ठात्री मानल्या जातात.
advertisement
Navratri 2025: 200 वर्षांचा पेशवेकालीन इतिहास, पुण्यातील या पेठेत आहे ऐतिहासिक कालिका मंदिर
पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा. मंदिरात लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवून त्यावर स्कंदमातेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. गंगाजल शिंपडल्यानंतर चुनरीने प्रतिमा झाकावी. पूजेच्या थाळीत फुले, मिठाई, दिवा, लवंग, वेलची आणि केळी ठेवून देवीला अर्पण करावे.
हा अर्पण करा नैवेद्य
स्कंदमातेला विशेषतः केळी अर्पण केली जातात. केळीचा हलवा, मिठाई आणि इतर फळे अर्पण केल्याने देवी प्रसन्न होऊन विशेष आशीर्वाद देतात, असा धार्मिक समज आहे.