Navratri 2025: 200 वर्षांचा पेशवेकालीन इतिहास, पुण्यातील या पेठेत आहे ऐतिहासिक कालिका मंदिर

Last Updated:

Navratri 2025: पुणे शहराच्या मध्यवर्तीभागात असलेल्या पेठेत पेशवेकालीन कालिका माता मंदिर आहे.

+
Navratri

Navratri 2025: 200 वर्षांचा पेशवेकालीन इतिहास, पुण्यातील या पेठेत आहे ऐतिहासिक कालिका मंदिर

पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली कसबा पेठ ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असलेली पेठ आहे. येथील कालिकामाता मंदिर असंख्य पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे. हे मंदिर फक्त धार्मिकदृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्या देखील महत्त्वाचं मानलं जातं. कारण, या मंदिराचा संबंध थेट पेशवे काळाशी आहे. त्वष्टा कासार समाज मंडळाचे कार्यकर्ते गिरीश पोटफोडे यांनी लोकल 18 शी बोलताना या मंदिराबाबत अधिक माहिती दिली.
पुण्यातील कसबापेठेतील तांबट आळीत त्वष्टा कासार समाजाचं पेशवेकालीन कालिका माता मंदिर आहे. या मंदिराला तब्बल 200 वर्षांचा पेशवेकालीन इतिहास लाभलेला आहे. पूर्णपणे कौलारू वास्तूमध्ये या मंदिराची जडणघडण करण्यात आलेली आहे. 1904 मध्ये नारायणराव रामराव पिंपळे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते.
advertisement
मंदिराची वास्तू आणि मूर्ती पाहिल्यास त्यावर तत्कालीन कलाकुसरीची छाप स्पष्ट जाणवते. मंदिरात उभी असलेली मूर्ती, दगडी बांधकाम, लाकडी खांबांवरील कोरीव काम हे सर्व त्या काळातील शिल्पकारांच्या कौशल्याची जिवंत उदाहरणं आहे. विशेष म्हणजे, मंदिरातील कालिकामातेची मूर्ती अत्यंत तेजस्वी असून भक्तांना आजही दर्शनावेळी एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव येतो.
पेशवे दरबारातील अनेक सरदार, कारभारी आणि स्थानिक लोक मंदिरात नित्यनियमाने दर्शनासाठी येत असत, अशी नोंद ऐतिहासिक पुराव्यांमध्ये आढळते. पुण्याच्या धार्मिक-सांस्कृतिक जीवनात या मंदिराचं एक वेगळं स्थान होतं. पुण्यातील जुन्या वाड्यांमधून आणि पेठांमधून निघणाऱ्या उत्सव-मिरवणुकीत देखील कालिकामातेला प्रमुख स्थान मिळत होतं.
advertisement
कालिकामाता त्वष्टा कासार समाजाची कुलदेवता
कालिकामाता त्वष्टा कासार समाजाची म्हणजेच तांबट समाजाची कुलदेवता आहे. तांबा आणि पितळाची भांडे घडवणे आणि त्यांची विक्री करणे, हा व्ययसाय तांबट समाज करतो. कसबा पेठेतील तांबट आळीमध्ये आजही अनेक कुटुंब हाच व्यवसाय करतात. आजही कसबा पेठेतील स्थानिक मंडळी या मंदिराला आपलं कुलदैवत मानतात. वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा, आणि उत्सव साजरे होतात. नवरात्रीत मंदिरात देवीची आराधना विशेष भक्तिभावाने पार पडते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: 200 वर्षांचा पेशवेकालीन इतिहास, पुण्यातील या पेठेत आहे ऐतिहासिक कालिका मंदिर
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement