पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, "अजितदादांच्या मृत्यूनंतर १८ व्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रीजमोहन श्रीवास्तव या तीन लोकांच्या सह्या आहेत. त्यांनी पक्षाचं संविधान बदललं. यात त्यांनी कार्याध्यक्ष यांना पक्षाचे सगळे अधिकार आहेत, असं सांगितलं. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना न सांगता हे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं. बाकी आमदारांनाही याची काही कल्पना दिली नाही."
advertisement
"या पत्राद्वारे या तीन नेत्यांनी अजित पवारांकडे असलेले सगळे अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिले. हे सुनेत्राकाकींना कळलं असावं, म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष होताच त्यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला. अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकचा भोंदूबाबा खरातकडून ही पूजा करण्याचा प्रयत्न झाला. अशी काळीजादू करण्यामागे पक्षावर नियंत्रण मिळवण्याचं कारण होतं का? त्यानंतर २८ तारखेला त्यांचा अपघात झाला की घातपात ? याचा शोध आम्ही घेत आहोत" असंही रोहित पवार म्हणाले.
"या अपघातानंतर पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं की प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांनी आपण अनावधानाने हे विधान केलं असं सांगितलं, मात्र घटनाक्रम पाहिला तर असं दिसतंय की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर पक्षाचे काही मोठे नेते यांच्यात कदाचित या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, तटकरे अजित दागदांच्या अंत्यविधीला काय हेतू मनात घेऊन आले होते, २७ जानेवारीला बैठकीला उशीर का झाला? याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
