अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचे सादरीकरण यावर चर्चा केली जाणार आहे. अजितदादांच्या या दौऱ्यात माजी मंत्री धनंजय मुंडेही आहेत.
अजितदादांच्या नेतृत्वात नियोजन समितीची बैठक, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांची उपस्थिती
advertisement
अजित पवार हे सोमवारी परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये विविध बैठका घेतील. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची दुसरी बैठक संपन्न होईल. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. नियोजन समितीची दुसरी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.
कायदा सुव्यवस्था प्रश्नी अजित पवारांना विरोधक घेणार, दादांच्या पोलीस प्रमुखांना आधीच सूचना
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात विरोधक अजित पवार यांना घेरण्याची शक्यता आहे. परळीमधील शिवराज दिवटे या तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणावर आज वादळी चर्चा होऊ शकते. परळीत शिवराज दिवटे याला मारहाण करताना मुंडे गँगचा धुडगूस पाहायला मिळाला. या मारहाणीची चित्रफित संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. ही चित्रफित पाहून अजित पवार यांनी बीडचे पोलीस प्रमुख नवनीत कॉवत यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. मारहाण प्रकरणातील आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे कुणीही असू द्या किंवा विरोधी पक्षाचे असू द्यात, त्यांना सोडू नका. चांगली अद्दल घडवा, अशा शब्दात अजित पवार यांनी कॉवत यांना कारवाईचे आदेश दिले.