अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजित पवारांसह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक, सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे.
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर बारामतीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातामधील प्रवाशांना रुग्णालयात आणल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात एकच गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत.
advertisement
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी राहिली. सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सिंचन, जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारख्या खात्यांमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतले. काही निर्णयांवरून ते वादातही सापडले, मात्र प्रशासकीय पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली.
