विमानातून केला होता अखेरचा फोन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. अजित पवार यांनी त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांच्याशी हा संवाद साधला होता. विमान हवेत असताना आणि अपघाताच्या काही काळ आधी हा फोन आला होता, अशी माहिती श्रीजीत पवार यांनी दिली आहे.
काय होता तो 'शेवटचा संवाद'?
advertisement
श्रीजीत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सकाळी ८:१९ मिनिटांनी अजितदादांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात एक मेसेज केला होता. विमानात रेंज मिळताच दादांनी स्वतःहून कॉल केला.
अजित पवारांनी एक मिनिटाच्या संवादात काय म्हटले?
अजित पवार: हॅलो हॅलो अरे बाबा.. दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्षं माळी समाजाचा माणूस आख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. आख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक काय एवढी एवढीशी नाही. तुम्हाला माहीत नसतं. काही नसतं. आम्हीपण सर्व जाती जाती-धर्मांना घेऊन जातो बाळा.
श्रीजीत पवार: आहे दादा, मला जे वाटलं ते मी तुमच्या समोर मांडलं.
अजित पवार: मान्य आहे. परंतु बरोबर आहे तुमच्या माळी समाजाच्या उमेदवाराला मी सुप्यामध्ये जिल्हा परिषदेची मी उमेदवारी दिली आहे. इथं ओबीसीचं रिजर्वेशन होतं. बाकीच्यांनी दिले नाही. पक्षांनी दुसरीच दिले आहे. त्या पद्धतीने आपण केला आहे.
श्रीजीत पवार: दादा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने करा..ओके..ओके थँक्यू
श्रीजीत पवार यांनी सांगितले की, "दादांशी माझे केवळ एक मिनिट बोलणे झाले. ते विमानात होते, पण तरीही त्यांनी मेसेजची दखल घेऊन कामासाठी फोन केला." शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणातील सामाजिक समतोल आणि सर्वसमावेशकतेचा विचार अजितदादांच्या मनात होता, हेच या संवादातून स्पष्ट होत आहे.
