TRENDING:

Sharad Pawar Ajit Pawar: काका-पुतण्या भाजपला शह देणार! पिंपरी-चिंचवडमध्ये दिसणार कोल्हापूर पॅटर्न?

Last Updated:

Ajit Pawar Sharad Pawar Alliance : भाजपला शह देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आघाडीचा हा कोल्हापुरी पॅटर्न पिंपरीत दिसण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील काही ठिकाणी स्थानिक समीकरणांच्या अनुषंगाने नवीन राजकीय समीकरणं, आघाडी तयारी होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. भाजपला शह देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आघाडीचा हा कोल्हापुरी पॅटर्न पिंपरीत दिसण्याची शक्यता आहे.
काका-पुतण्या भाजपला शह देणार? पिंपरी-चिंचवडमध्ये कोल्हापूर पॅटर्न?
काका-पुतण्या भाजपला शह देणार? पिंपरी-चिंचवडमध्ये कोल्हापूर पॅटर्न?
advertisement

राज्यातील सर्वात श्रीमंत आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर (PCMC) गेल्या काही वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, आता ही सत्ता उलथवण्यासाठी विरोधकांनी मोठी राजकीय चाचपणी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असलेले अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.

advertisement

काही दिवसांपूर्वीचे महायुती सरकारमधील मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करत चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणत शहर विकास आघाडीची घोषणा केली. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकांमध्ये हा कोल्हापूर पॅटर्न दिसण्याची शक्यता वाढू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आघाडीसाठी शरद पवार गटाकडून प्रस्ताव आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले असल्याचे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितले.दोन्ही गट एकत्र आल्यास मतविभागणी टाळली जाईल आणि भाजपला फायदा होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मंगळवारी स्थानिक पातळीवरील आघाडी करण्याबाबतचे अधिकार हे स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वाला देण्यात आल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते.

advertisement

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपने भेदला...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा रथसप्तमीला सुवर्णयोग! ‘त्या’ इच्छा होतील पूर्ण, का करतात सूर्यदेवाची पूजा?
सर्व पहा

१९९२ ते १९९९ या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर या शहरात राष्ट्रवादीने जोरदार पकड निर्माण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पीसीएमसीवर राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला २०१७ पर्यंत टिकून राहिला. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा गड भेदत सत्ता हस्तगत केली. आता पुन्हा एकदा या गडावर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य युतीमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar Ajit Pawar: काका-पुतण्या भाजपला शह देणार! पिंपरी-चिंचवडमध्ये दिसणार कोल्हापूर पॅटर्न?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल