अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विटे घाटात आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला. अकोले येथून राजूरकडे जाताना त्यांच्या गाडीला ट्रकची समोरासमोर धडक बसली. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे या अपघातातून थोडक्यात बचावले.
दरम्यान, अपघातात लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी गेले.
कोण आहेत किरण लहामटे?
advertisement
-किरण लहामटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत
-एकत्रित राष्ट्रवादी असताना ते अकोलेचे आमदार होते
-शरद पवार यांनी त्यांना पिचड यांच्याविरोधात उमेदवारी देऊन अकोलेतून निवडून आणले होते
-मात्र राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणे पसंत केले
-विधानसभा निवडणूक २०२४ ला अजित पवार यांनी पुन्हा किरण लहामटे यांना उमेदवारी दिली
-यंदाच्या विधानसभा निवडणूक पुन्हा लहामटे यांनी जिंकून सलग दुसऱ्यांदा विधिमंडळात प्रवेश केला.
-अकोल्याची ओळख आदिवासीबहुल मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी लढणारे नेते म्हणूनही लहामटे यांची ओळख होत आहे.