TRENDING:

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमानतळाची धावपट्टी..., अजितदादांच्या विमान अपघातबद्दल मुख्यमंत्र्यांचा नवा खुलासा

Last Updated:

३ अधिकाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. घटनास्थळी तपासणी केली आहे. बारामती विमानतळावर अधिकृत एमटी मिट्रोनॉजीकल सुविधा उपलब्ध नाही. VFR  उड्डाणासाठी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अजूनही काही प्रश्न कायम आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अपघात प्रकरणावर सविस्तर निवेदन दिलं आहे. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या धावपट्टीबद्दल पहिल्यांदाच अहवालात काय नमूद केलं होतं, याची माहिती दिली. ही धावपट्टी पूर्णपणे  अनकंट्रोल एअर फिल्ड असणारी आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
News18
News18
advertisement

अजित पवार विमान अपघात प्रकरणी कर्नाटकमध्ये एफआयआर करण्यात आला आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवदेन देत, कर्नाटक सरकार आणि पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला.

"केंद्र सरकारने एएआयबीकडून तपासणी सुरू केली आहे, प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यामध्ये अपघाताची माहिती मिळताच एएआयबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली आणि पाहणी केली. ३ अधिकाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. घटनास्थळी तपासणी केली आहे. बारामती विमानतळावर अधिकृत एमटी मिट्रोनॉजीकल सुविधा उपलब्ध नाही. VFR  उड्डाणासाठी दृश्यमानता ५ हजार मिटरपेक्षा जास्त असण्याची आवश्यकता आहे. घटनेच्या वेळी ३ हजार इतकी दृश्यमानता होती. विमानतळावर विंडशॉक शिवाय दुसरे काहीही नव्हतं. त्यामुळे विमानाचं लँडिंग हे पायलटच्या अनुभवावरच करू शकत होते. विमानतळावर कोणतीही एअरकाफ्ट रेस्क्यू अशी कोणतीही व्यवस्थाही नव्हती. २०१६ नंतर धावपट्टीवर डांबरीकरण झालं नाही, खड्डी आणि चिन्ह फिकी झाल्याचे आढळले होते. बारामतीची धावपट्टी ही अनकंट्रोल एअर फिल्ड असणारी आहे. सारांश सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी सुरू आहे. अंतिम अहवालानंतर सगळ्या बाबी स्पष्ट होतील" असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

advertisement

'वेळ आली तर कुणाला मुडदा सुद्धा खोदून काढू, पण सहन नाही करणार'

"अजितदादांच्या केसमध्ये तुमच्या मनात शंका ठेवू नका, आकाशपाताळ एक करू, जर कुणाचा हात असेल, कुणाचा बाप असला तरी सोडणार नाही, वेळ आली तर कुणाला मुडदा सुद्धा खोदून काढू, सहन नाही करणार, कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असेल पण भावना बोथट नाही. अजितदादांच्या प्रकरणात कुणी कट रचला असेल तर सोडणार नाही. तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या प्रयत्नाला माझं समर्थन आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, काही जणांमध्ये नाही ते दाखत नसतील. पण मी पुन्हा एकदा सांगतो, सगळी चौकशी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत काहीही चुकीचं होऊ देणार नाही' असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

advertisement

पायलटने मद्यपान केलं नव्हतं, सगळ्यांचे डीएनने जुळले

'अजित पवार हे मुंबई विमानतळावर गेले होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे. अजितदादांसह ४ जणांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये शरिर आणि मेंदूला अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. डीएनए रिपोर्ट सुद्धा आला आहे, यामध्ये नातेवाईकांचे डीएनए जुळले आहे. पायलट आणि को पायलटचा व्हिसेरा तपासला असून कुणीही मद्यपान केले नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विमानामध्ये कोणतेही स्फोट असे काही आढळले नाही. पीए, सुरक्षा अधिकारी, व्हीएसआर कंपनीचा मालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. विमानातून कोणतेही इंधनाचे कॅन वाहून नेले नाही' असंही फडणवीसांनी सांगितलं.

advertisement

पायलटची ऐनवेळी ड्युटी लावली नाही

विमानाचे क्रू डिटेल्स हे बारामती एअर डायरेक्टरला करण्यात आले होते. पायलट आणि को पायलटची नेमणूक करण्यात आली होती. व्हिएसआर टीमनेच कॅप्टन राहुल ऑबरॉय आणि दिलीप सिंग यांना पायलट म्हणून रात्री १० वाजता नेमणूक केलं होतं. पण, पायलट राहुल ऑबरॉय यांचं पोट खराब होतं, त्यामुळे लातूरला जाणाऱ्या विमानावर ड्युटी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, असं सांगितल्यानंतर वीएसआर टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कुमार आणि को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमण्याचे नवीन रोस्टर तयार केले होते, ऐनवेळी कोणतीही पायलटची नेमणूक केली नाही, आदल्या रात्री २३.५४ मिनिटांनी नेमणूक केली होती.  विमान उड्डाणपूर्वी पूर्ण आराम केला होता. शांभवी पाठक यांना ९ दिवस आराम मिळाला होता, त्यामुळे दोन्ही पायलटने पूर्ण आराम करून ड्युटीवर हजर झाले होते.

advertisement

VSR कंपनीकडे 36 विमानं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वनवासी रामाची एकाच दगडातून घडवलेली मूर्ती, महाराष्ट्रातील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

दुर्घटनाग्रस्त 45 VSR विमान हे व्हिएसआर कंपनीच्या मालकीकडे होतं. त्याची डेडलाईन ही २०२७ पर्यंत होती. विमानाची तपासणी पूर्ण केली होती. २३ मार्च २०२५ मध्ये शेवटची तपासणी केली होती. कंपनीकडे एकूण १६ विमानं असून ३६ पायलट आहे.  एआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर तो तपासात सहभाग केला जाईल. सीआयडीची मार्फत तपास सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: बारामती विमानतळाची धावपट्टी..., अजितदादांच्या विमान अपघातबद्दल मुख्यमंत्र्यांचा नवा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल