TRENDING:

Ajit Pawar Plane Crash: लॅण्डिंगआधीच विमान आगीचा गोळा, स्फोट झाला तेव्हा प्लेनमध्ये किती होतं इंधन?

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला आहे. विमानाचा स्फोट झाला तेव्हा किती इंधन होते, याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या अकाली एक्झिटने सगळ्यांनाच चटका लागला आहे. अजितदादांसोबत विमानातील क्रू, दादांसोबचा सुरक्षा रक्षकही यांचेही निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला आहे. विमानाचा स्फोट झाला तेव्हा किती इंधन होते, याची माहिती समोर आली आहे.
लॅण्डिंगआधीच विमान आगीचा गोळा, स्फोट झाला तेव्हा प्लेनमध्ये किती होतं इंधन?
लॅण्डिंगआधीच विमान आगीचा गोळा, स्फोट झाला तेव्हा प्लेनमध्ये किती होतं इंधन?
advertisement

अजित पवार हे बुधवारी, बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी दाखल होणार होते. मात्र, बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना भीषण अपघात झाला. धावपट्टीपासून विमान १०० फूट उंचीवर आणि ५० फूट अंतरावर असताना हा भीषण अपघात झाला. यावेळी विमान जमिनीला आदळल्यानंतर स्फोट झाला आणि आगीचा लोळ उठला.

विमान लँडिंगच्या वेळी जेव्हा जमिनीवर आदळले, तेव्हा विमानाचा अक्षरशः गोळा झाला. या भीषण आगीमागे विमानातील इंधनाचा मोठा साठा कारणीभूत असल्याचे उघड झाले असून, बारामती विमानतळावरील सुविधांच्या अभावाने हा अपघात अधिक प्राणघातक ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

advertisement

विमानात किती टन होतं इंधन?

हे विमान मुंबईहून बारामतीला गेले होते आणि तिथून ते पुन्हा मुंबईला परतणार होते. प्रवासाच्या गणितानुसार, मुंबई ते बारामती प्रवासासाठी साधारण ४०० लिटर इंधन वापरले गेले होते. परतीच्या प्रवासासाठी, आपत्कालीन स्थितीसाठी आणि राखीव साठा मिळून विमानात एकूण १४०० लिटर (१.१२ टन) इंधन शिल्लक होते. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टी सोडून खड्ड्यात आदळताच, या मोठ्या इंधन साठ्यामुळे आगीचा प्रचंड डोंब उसळला. यामुळेच विमानात असलेल्यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

advertisement

'आयएलएस' (ILS) यंत्रणेचा अभाव नडला

अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे बारामती विमानतळावर असलेली 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम' (ILS) ची उणीव असल्याचे सांगण्यात येते. आयएलएस ही यंत्रणा दाट धुक्यात किंवा खराब हवामानात रेडिओ सिग्नलद्वारे वैमानिकाला धावपट्टीची अचूक दिशा दाखवते.

बारामतीला ही सुविधा नसल्याने वैमानिकाला केवळ स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवून (Manual Landing) विमान उतरवावे लागले. धुक्यामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती आणि सिग्नलची मदत नसल्याने वैमानिकाचा अंदाज चुकला असल्याचे सांगण्यात येते.

advertisement

भौगोलिक परिस्थिती आणि दृश्यमानता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे दर वाढले, शेवगा आणि डाळिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

बारामती विमानतळ परिसरातील टेकड्या आणि पठारी भागामुळे येथे जमिनीलगत धुक्याचे प्रमाण अचानक वाढते. मंगळवारी देखील असंच घडलं. दाट धुक्यात धावपट्टी शोधण्याच्या प्रयत्नात विमान चुकीच्या दिशेला गेले आणि इंधनाचा साठा मोठा असल्याने अपघाताचे रूपांतर भीषण आगीत झाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: लॅण्डिंगआधीच विमान आगीचा गोळा, स्फोट झाला तेव्हा प्लेनमध्ये किती होतं इंधन?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल