TRENDING:

Ajit Pawar : एक, दोन नव्हे तर 'या' ४ मुद्यांवर तपासाची सुई, अजितदादांच्या विमान अपघाताचं कोड कसं उलगडणार?

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash Investigation: 'लिअरजेट ४५' (Learjet 45) विमानाचा अपघात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियंका कांडपाल, न्यूज १८, मुंबई: बारामती येथे झालेल्या 'लिअरजेट ४५' (Learjet 45) विमानाचा अपघात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. ही केवळ तांत्रिक दुर्घटना होती की यामागे काही मानवी चुका होत्या, याचा उलगडा करण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रामुख्याने चार मोठ्या मुद्यांवर चौकशी केंद्रित करण्यात आली आहे.
एक, दोन नव्हे तर 'या' ४ मुद्यांवर तपासाची सुई, अजितदादांच्या विमान अपघाताचं कोड कसं उलगडणार?
एक, दोन नव्हे तर 'या' ४ मुद्यांवर तपासाची सुई, अजितदादांच्या विमान अपघाताचं कोड कसं उलगडणार?
advertisement

'सीएनएन न्यूज १८' ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या विमानाची मालकी असलेल्या 'व्हीएसआर व्हेंचर्स प्रा. लि.' (VSR Ventures Pvt. Ltd.) या कंपनीचे विशेष लेखापरीक्षण (Audit) करण्याचे आदेश दिले आहेत.

> घटनास्थळावरून पुरावे गोळा

घटनेनंतर लगेचच AAIB च्या दिल्ली मुख्यालयातील आणि DGCA च्या मुंबई कार्यालयातील पथके बारामतीमध्ये दाखल झाली आहेत. त्यांनी अपघातस्थळावरून विमानाचे अवशेष, ब्लॅक बॉक्स आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत.

advertisement

>> कोणत्या ४ कारणांवर होतोय तपास?

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) खालील चार बाबींचा सखोल तांत्रिक तपास करत आहे

१. तांत्रिक बिघाड (Technical Failure):

विमानाच्या इंजिनमध्ये किंवा नियंत्रण प्रणालीत उड्डाणादरम्यान काही बिघाड झाला होता का? या मुद्यावरही तपास सुरू आहे.

२. वैमानिकाची चूक (Pilot Error):

विमान लँडिंग होण्याआधी पायलटने दृष्यमानतेचे कारण देत पहिल्या प्रयत्ना लँडिंग टाळले होते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा अपघात झाला. त्यामुळे विमानाचे लँडिंग करताना वैमानिकाकडून काही तांत्रिक निर्णय चुकले का? याचाही तपास होणार आहे.

advertisement

३. प्रतिकूल हवामान (Weather Conditions):

अपघाताच्या वेळी बारामतीमधील हवामान आणि दृश्यमानता (Visibility) कशी होती? त्याचा लँडिंगवर परिणाम झाला का? खराब हवामान हेच अपघाताचे कारण ठरले का, हा मुद्दादेखील कळीचा ठरणार आहे.

४. लँडिंगमधील त्रुटी (Landing Fault):

प्राथमिक माहितीनुसार, विमान दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या 'गो-अराउंड' प्रक्रियेत नेमकी काय चूक झाली? पायलटकडून लँडिंग करताना मोठी चूक झाली का, याचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.

advertisement

> चार्टर कंपनीचे 'स्पेशल ऑडिट'

DGCA ने विमान ऑपरेटर कंपनीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विमान देखभालीमध्ये (Maintenance) कोणतीही निष्काळजीपणा झाला होता का? आणि विमान वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का? याची चौकशी करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

> तपासाचे फलित काय?

advertisement

AAIB च्या तपासातून अपघाताचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल, तर DGCA च्या तपासातून विमान कंपनीच्या प्रशासकीय आणि देखभालीतील त्रुटी समोर येतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

या हाय-प्रोफाइल तपासामुळे आता विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा मानकांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या चारही मुद्यांवरील अहवाल आल्यानंतरच अजित पवारांच्या निधनामागचे नेमके सत्य महाराष्ट्रासमोर येईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : एक, दोन नव्हे तर 'या' ४ मुद्यांवर तपासाची सुई, अजितदादांच्या विमान अपघाताचं कोड कसं उलगडणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल