मुंबई : मुंढवा परिसरातील तब्बल 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद पेटला आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांची नावे नमूद आहेत. याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव का घेण्यात आलं नाही त्याच्यावर गुन्हा का नोंद झाला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी न्युज १८ लोकमतला ही माहिती दिली आहे.
advertisement
पार्थ अजित पवार यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. संबंधित वादग्रस्त कंपनीचे कायदेशीर अधिकार दिग्विजय पाटील यांच्याकडे आहे.मात्र पुढील तपासात कंपनीमध्ये संचालक पदावर असणारे पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पार्थ अजित पवारांनीच मूळ शासकीय जमीन खरेदी केली असल्याचे पुरावे असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या कंपनीत पदावर असल्याने पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यत आहे. अतिरिक्त चौकंशीत पार्थ नाव समोर आल्यावर एफआयआरमध्ये अतिरिक्त आरोपी म्हणून नाव टाकता येऊ शकते. त्यानुसारच पार्थ यावर कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्युज १८ लोकमतला माहिती दिलेली आहे.
कागदोपत्री दोषी सापडले तर त्यांच्यावर गुन्दा दाखल होण्याची शक्यता
पार्थ पवार यांचे नाव अतिरिक्त आरोपी म्हणून एफआयआरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांच्याकडे कंपनीचे अधिकार सध्या नव्हते मात्र ज्यावेळी जमीन खरेदी झाली त्यावेळी त्यांचे सही त्यावेळी होती. अतिरिक्त आरोपी करण्याची जी तरतूद आहे त्यानुसार दिग्विजय पाटील यांच्याकडे कायदेशीर अधिकार असल्याने त्यांचे नाव आले आहे. दुसऱ्या बाजूला हा तपास या पद्धतीने पुढे गेल्यास या संपूर्ण प्रकरणात पार्थ पवार हे देखील कागदोपत्री दोषी सापडले तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पार्थ पवार यांचे नाव वगळल्याने राजकारण तापले
जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यावेळी पार्थ पवार यांचे नाव वगळल्याने राजकारण तापले आहे. मात्र तुर्तास हा पार्थ पवारांना दिलासा असला तरी आगामी काळात पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अतिरिक्त आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
