'काहींना वाटतंय या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा या खुर्चीवर आहे. आम्ही काय बेअक्कल आहे का? खूर्ची एक असेल तर तिथे दोघांनी डोळा ठेवून कसं काय चालेल? आणि ती खूर्ची भरलेली आहे ना? व्यक्ती बसलेली आहे. मला हे खरं काढायचं नव्हतं, पण आम्ही बोललो नाही की एकच बाजू लोकांना दिसते आणि दुसरी बाजू दिसत नाही', असा घणाघात अजित पवारांनी केला.
advertisement
याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री बदलाचा कोणताही विषय नसल्याचं नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केलं होतं. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असं सांगून फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
'या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच राहणार आहेत, दुसरा कोणताही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. मी आणि अजित पवार यांच्यात पूर्णपणे स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली तेव्हा अजितदादांना अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली होती. ती त्यांनी स्वीकारली आहे, एवढच नाही मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही, करण्याचं कारणही नाही, असं अजितदादा त्यांच्या वक्तव्यात म्हणाले आहेत', असं फडणवीस म्हणाले होते.
'महायुतीतले काही जण वक्तव्य करत आहेत, कनफ्यूजन निर्माण करणं तात्काळ बंद केलं पाहिजे. यातून महायुतीसंदर्भात संभ्रम तयार होतो. नेत्यांमध्ये संभ्रम नाही, शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार आहेत. कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही', या कठोर शब्दात फडणवीस यांनी सुनावलं होतं.
