TRENDING:

सावधान! रील बनवताय की चोरीची संधी देताय? अकोल्यात 'रीलबाज' मैत्रिणीचा 20 लाखांचा कारनामा उघड

Last Updated:

अवघ्या नऊ दिवसांत या चोरीचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना अटक केली असून तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अकोला : मोबाईलवर रील्सचा ट्रेंड सध्या प्रचंड वाढला असून, प्रसिद्धीच्या ओढीने अनेकजण समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. या रील्सच्या नादात काहीवेळा अनपेक्षित आणि धक्कादायक प्रसंग ओढवतात, याचेच बोलके उदाहरण अकोला शहरात समोर आले आहे. केवळ रील तयार करण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
News18
News18
advertisement

अकोला शहरातील जुना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 फेब्रुवारी रोजी 19 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 90 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या नऊ दिवसांत या चोरीचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

advertisement

कसं केलं मैत्रिणीने मैत्रिणीचं घर साफ? 

फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत ओळख झाली होती. ही ओळख हळूहळू मैत्रीत रूपांतरित झाली आणि दिवसेंदिवस दोघींमधील विश्वास अधिक घट्ट होत गेला. या मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा घेत आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला रील बनवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. रील तयार करत असताना फिर्यादीचे लक्ष विचलित करून आरोपीने अलमारीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 20 लाखांचा ऐवज लंपास केला.

advertisement

एक महिला आणि तीन पुरुषांना अटक

चोरीनंतर आरोपी महिलेने हा ऐवज आपल्या तीन साथीदारांकडे लपवून ठेवला आणि सर्व काही गुपचूप घडवून आणले. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांवर नजर ठेवत चौकशी सुरू केली. अखेर आरोपी महिलेने आणि तिच्या तिन्ही साथीदारांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, एक महिला आणि तीन पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.

advertisement

मैत्री आणि प्रसिद्धीच्या हव्यासातून कधी मोठी किंमत मोजावी लागली 

या घटनेमुळे समाजमाध्यमांच्या अतिरेकामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आभासी मैत्री आणि प्रसिद्धीच्या हव्यासातून कधी मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे दर पुन्हा तेजीत, डाळिंब आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

3 पट पैशांचे आमिष, मित्रानेच घातला 1 कोटी 28 लाखांना गंडा, जालन्यात धक्कादायक प्रकार

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावधान! रील बनवताय की चोरीची संधी देताय? अकोल्यात 'रीलबाज' मैत्रिणीचा 20 लाखांचा कारनामा उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल