आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1187 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 603 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3750 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 24 क्विंटल आल्यास 5500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
द्राक्षांवर वाढला केवडा-भुरीचा प्रादुर्भाव? वेळीच करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
advertisement
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 304 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1400 क्विंटल द्राक्षास 140 ते 400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 55 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या आवकेत सुधारणा
आज राज्याच्या मार्केटमध्ये 474 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी सोलापूर बाजारात 252 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6500 ते 16700 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल डाळिंबास 12500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





