TRENDING:

Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात, निकालाचा पहिला कल काय?

Last Updated:

Ambernath Nagar Parishad Results:राडा, गोळीबार, उमेदवारांना धमक्या, बोगस मतदारांचा दावा अशा वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

advertisement
अंबरनाथ: राडा, गोळीबार, उमेदवारांना धमक्या, बोगस मतदारांचा दावा अशा वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीस काही कारणांनी उशिराने सुरुवात झाली.
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू,  निकालाचा पहिला कल काय?
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला कल काय?
advertisement

शिवसेना शिंदे गट-भाजप युतीत फोडाफोडीचा वाद जो दिल्ली पर्यंत पोहोचला होता त्याची सुरुवात अंबरनाथ येथून झाली होती. याच अंबरनाथ नगरपरिषदेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथ येथून शिवसेनेचे नगरसेवक भाजपाने फोडले होते. ही निवडणूक भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे आज अंबरनाथ मध्ये निकाल काय लागतो यांवर रविंद्र चव्हाणांचे यश अवलंबून आहे. रविंद्र प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच नगरपरिषद निवडणूक आहे.

advertisement

तब्बल दोन महिने प्रचारा करता मिळाल्यानंतर काल २० डिसेंबरला अंबरनाथ नगरपरिषदे करता मतदान पार पडले. ९ वर्षांनी झालेल्या मतदानाला अंबरनाथकरांनी चांगला प्रतिसाद देत ५४.५५ टक्के मतदान केलं. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र, जवळपास तासभर उशिराने मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्यांदा पोस्टल वोटींगची मतमोजणीला सुरुवात झाली. जनतेतून थेट नगराध्यक्षाची निवड होणार आहे. शिवसेना शिंदेकडून मनिषा वाळेकर तर भाजपाकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यात थेट लढत आहे.

advertisement

अंबरनाथ नगर परिषदेचा पहिला कल समोर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिना, पाहण्यासाठी तुफान गर्दी, Video
सर्व पहा

अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या कलात भाजपने आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या कलामध्येे फेऱ्यागणिक बदल होणार असल्याचे संकेत दिसू लागले. पोस्टल मतांमध्ये भाजपने ५ मतांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीच्या वेळेस  नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांना 5990 मते, तर  शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांना 4868 मते मिळाली. भाजप 1 हजार 122 मतांनी आघाडीवर असून चुरशीची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात, निकालाचा पहिला कल काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल