भावाने घटनास्थळी धाव घेतली अन्...
या थरारक घटनेची सुरुवात शनिवारी रात्री झाली. पिंकी यांच्या घरी नियमित साफसफाईसाठी येणारे अशोक खंडारे (वय 60) यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते परतले. रविवारी दुपारीही जेव्हा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना घरात शांतता जाणवली. त्यांनी तत्काळ पिंकीच्या भावाला संपर्क साधला. भावाने घटनास्थळी धाव घेतली आणि घरात प्रवेश करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
advertisement
भिंतीवर रक्ताचे शिंतोडे अन् आक्षेपार्ह शब्द
पिंकी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पलंगाजवळ पडलेल्या होत्या आणि त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने केलेले भयंकर वार स्पष्ट दिसत होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा खून शनिवारी रात्री झाला असावा. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळावरील भिंतीवर रक्ताचे शिंतोडे पसरलेले होते आणि आक्षेपार्ह शब्द लिहिलेले आढळले.
चोरी नाही फक्त मर्डर
घरात जबरी चोरीचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे, हा खून केवळ चोरीच्या उद्देशाने झाला नाही, तर त्यामागे वैयक्तिक वैर, ओळखीतील व्यक्तीचा संताप किंवा अन्य कोणताही गंभीर वाद असावा, अशी भीती व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही फुटेज डिलीट
राजापेठ पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्ताचे नमुने घरातील वस्तूंची मांडणी आणि भिंतीवरील ती गूढ लिपी तपासण्यासाठी ताब्यात घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहेत, आरोपीने घरातील सीसीटीव्ही फुटेजचा डाटा देखील डिलीट केला आहे. त्यामुळे आरोपीला घराची सगळी माहिती होती, असं मानल जातंय.
