TRENDING:

PSI Accident : पोरीचा शाळेत पहिला नंबर आला, बापानं पेढे वाटले पण घरी येताना सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! Video

Last Updated:

Amravati PSI Accident Video : देवगाव चौफुलीवर धामणगाववरून यवतमाळकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वानखडे यांची कार पूर्णपणे चकणाचूर झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Amravati Crime News : गेल्या काही दिवसात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशातच अमरावतीमधून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव चौफुलीवर एका भरधाव रुग्णवाहिकेने कारला दिलेल्या भीषण धडकेत 8 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे यांची मुलगी त्रिशा हिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघाताचे दृश्य अत्यंत थरारक आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
Amravati PSI Rahul Wankhede Accident CCTV Video
Amravati PSI Rahul Wankhede Accident CCTV Video
advertisement

त्रिशाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल वानखडे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह तळेगावच्या दिशेने खाजगी कारने जात होते. देवगाव चौफुलीवर धामणगाववरून यवतमाळकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वानखडे यांची कार पूर्णपणे चकणाचूर झाली. या अपघातात त्रिशाचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल वानखडे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.

advertisement

वर्गात प्रथम क्रमांक अन् पेढे वाटले

हृदयद्रावक बाब म्हणजे, 8 वर्षीय त्रिशा ही धामणगाव येथील शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होती. परीक्षेत तिचा वर्गात प्रथम क्रमांक आल्यामुळे वानखडे कुटुंबीय आनंदात होते. वानखेडे कुटूंबियांनी शाळेत पेढे वाटण्यासाठी गेले होते. शाळेतून परतत असताना देवगाव येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर निघतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुळ झालं. तर गाडीतील दोघं गंभीर जखमी झाले आहेत.

advertisement

अँब्युलन्स ड्राईव्हरवर कारवाई होणार का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video
सर्व पहा

दरम्यान, तळेगाव दशासर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक हुशार आणि गुणी मुलगी अपघातात दगावल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. तर आता अँब्युलन्स ड्राईव्हरवर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
PSI Accident : पोरीचा शाळेत पहिला नंबर आला, बापानं पेढे वाटले पण घरी येताना सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल