यावेळी आंचल मामीडवार आणि उपस्थित सक्षम ताटेच्या कुटुंबासोबत पोलिसांचा वाद झाला तसेच धक्काबुक्कीही झाली. नांदेड शहरातील जुनागंज भागात 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आचल मामीडवारच्या वडिलांनी आणि भावांनी सहकाऱ्यांसोबत सक्षमची हत्या केली होती. सर्व आरोप अटक आहेत. मात्र घटनेच्या दिवशी इतवारा पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माही दासरवाड, धीरज कोमूलवाड यांनी आचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
advertisement
सक्षम तुझ्या बहिणीला रोज घेऊन फिरतो, आधी त्याला मार आणि नंतर पोलीस स्टेशनला ये, असे संबंधित पोलीस कर्मचारी माझ्या कुटुंबियांना म्हणाले असा आचलचा आरोप आहे. या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आचल मामीडवार आणि सक्षम ताटे याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता.
परंतु आजपर्यंत कारवाई न झाल्याने आज आंचल मामीलवार आणि आणि सक्षम ताटे त्याच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. आजच कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही आमचे जीवन संपवू, असा इशारा आंचल मामीडवार आणि सक्षम ताटे याच्या आईने दिला.
