एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी, उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर आज हा पक्ष प्रवेश झाला आहे. यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मोठा शक्ती प्रदर्शन करत शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.
advertisement
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून पक्षप्रवेश सुरू असून कट्टर शिवसैनिक हे परत येत आहेत. हवेत प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेसबरोबर गेले किवा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धूळफेक करण्याचे काम केले . भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, अजित पवार निधी देत नाही अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देत आहे. शिवसेनेची वट आजही ठाण्यात आहे.
भगव्यावर कोणतही चित्र छापू नका : उद्धव ठाकरे
ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. भगव्यावर कोणतही चित्र छापू नका तो शिवरायांचा आहे तो पवित्र आहे तो तसाच फडकला पाहिजे. मशाल घेऊन पुढे चला मशालीच्या तेजाने सर्व जळमट जळून खाक होईल. इतरांनी जे केले ते तुम्ही करू नका.. निवडणूक आयोगावर न बोलेल चांगले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राजकारणामध्ये मोठा उलटफेर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत, पक्षांतराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, तर काही ठिकाणी अनेक जण आपल्या मित्र पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वाधित फटका हा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे, कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते देखील महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत, विधानसभा निवडूकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये इनकमिंग सुरू झालं होतं, हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. निवडणूक जाहीर झाली असताना होणारे पक्षप्रवेश हा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे, मात्र आता राजकारणामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे.
