मुंबई महापालिकेतील काही माजी नगरसेवक शिवसेनेतून उबाठात जाणार असल्याच्या वावड्या पसरवल्या जात होत्या. ज्या नगरसेवकांबाबत गैरसमज पसरवले जात होते, त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सर्व नगरसेवक खंबीरपणे शिवसेनेत असल्याची ग्वाही देतानाच, येणारी निवडणूक दणदणीत मताधिक्याने जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केलाय.
तब्बल दीड तास चालली बैठक
advertisement
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भूसे यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होती. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणूकांचू रणनिती संदर्भात चर्चा होणार आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून द्याव्यात, अशा सूचना सर्व आमदार व खासदारांना देण्यात आल्या.
बैठकीसाठी उपस्थित राहिलेले मंत्री आमदार आणि खासदार
मंत्री उदय सामंत,
मंत्री शंभूराजे देसाई
मंत्री संजय शिरसाट
मंत्री दादाजी भुसे
राज्यमंत्री योगेश कदम
आमदार अब्दुल सत्तार
आमदार दीपक केसरकर
आमदार नीलम गोरे
आमदार निलेश राणे
आमदार प्रकाश सुर्वे
आमदार शहाजी बापू पाटील
आमदार महेंद्र दळवी
आमदार मंगेश कुडाळकर
आमदार दिलीप मामा लांडे
आमदार मनीषा कायंदे
आमदार तुकाराम काते
आमदार सुहास कांदे
राजेंद्र गावित
माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे
संजय गायकवाड
मंजुळाताई गावित
खासदार नरेश मस्के
खासदार श्रीरंग बारणे
खासदार रवींद्र वायकर
खासदार संदीपान भुमरे
खासदार मिलिंद देवरा
माजी खासदार संजय निरुपम
खासदार प्रतापराव जाधव
माजी खासदार गजानन कीर्तिकर
माजी खासदार राहुल शेवाळे