TRENDING:

Ashadhi ekadashi 2024 : ‘अवघे गर्जे पंढरपूर’; चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा, VIDEO

Last Updated:

लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मांदियाळी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तांचा जनसागर ओसंडून वाहत असल्याचं आज पाहायला मिळतं आहे . भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मांदियाळी आहे.
चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा
चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा
advertisement

विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अकरा पत्रा शेड भाविकांनी भरले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शनानंतर भाविक आनंदी झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली.

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

advertisement

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.‌

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं पांडुरंगाचे आभार मानले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक सुखी-समाधानी व्हावा हेच मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी 103 कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करुन त्यासाठी 103 कोटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही सेवा देण्यात येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashadhi ekadashi 2024 : ‘अवघे गर्जे पंढरपूर’; चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल