तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
रायचंद शिंदे, प्रतिनिधी पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं पांडुरंगाचे आभार मानले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक सुखी-समाधानी व्हावा हेच मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं त्यांनी म्हटलंय.
अकरा पत्रा शेड भाविकांनी फुल्ल झाले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली
दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी 103 कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करुन त्यासाठी 103 कोटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही सेवा देण्यात येणार आहे.
advertisement
तिरुपतीमध्ये टोकन सेवा सकाळी पाच वाजल्यापासून सुरू असते. त्यासाठी टोकन घेऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड दाखवून रांगेत उभं न राहता थेट दर्शन घेता येतं. तासंतास रांगेत उभं न राहता हे दर्शन घेता येतं. त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी किती पैसे भरावे लागणार, किती वेळ ही सुविधा असणार याबाबत सविस्तर माहिती समोर आली नाही.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
July 17, 2024 7:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा


