TRENDING:

16 लाखांच्या जमिनीची किंमत दोन तासात 32 लाखांवर, खरातच्या आश्रमाचा नवा कारनामा समोर

Last Updated:

अवघ्या दोन तासांत जमिनीची किंमत दुप्पट दाखवून ती 'दान' करण्याच्या या 'मॅजिक'मुळे संशयाची सुई आता नव्या दानशूराकडे वळली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक:  अशोक खरात याच्या अब्जावधींच्या कथित काळ्या साम्राज्याचा तपास सुरू असतानाच नरेंद्र नारायण हेटे नावाच्या एका बड्या दानशूराची एन्ट्री झाली आहे. हेटे यांनी खरातच्या 'शिवनिका संस्थान ट्रस्ट'ला दिलेल्या जमिनीच्या दानामध्ये प्रचंड मोठी विसंगती समोर आली असून, हा केवळ धार्मिक भावनेतून केलेला प्रकार नसून तो एक नियोजनबद्ध आर्थिक व्यवहार असल्याचा दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केला आहे. अवघ्या दोन तासांत जमिनीची किंमत दुप्पट दाखवून ती 'दान' करण्याच्या या 'मॅजिक'मुळे संशयाची सुई आता नव्या दानशूराकडे वळली आहे.
ashok kharat news
ashok kharat news
advertisement

नारायण हेटे नावाचा व्यक्ती खरातवर कशी खैरात करत होतं, हे कुंभारांनी पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, नरेंद्र हेटे यांनी एका दिवशी 5 एकर जमीन विकत घेतली. या जमिनीचा बाजारभाव 16 लाख रुपये दाखवण्यात आला, तर प्रत्यक्ष खरेदी 24 लाख रुपयांत झाली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, खरेदीखत झाल्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांच्या आत हीच जमीन अशोक खरातच्या ट्रस्टला 'दान' म्हणून देण्यात आली. विशेष म्हणजे दान करताना या जमिनीची किंमत थेट 32 लाख रुपये दाखवण्यात आली. अवघ्या काही तासांत जमिनीचे मूल्य 16 लाखांनी कसे वाढले? हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

advertisement

कोण आहेत नरेंद्र हेटे?

नरेंद्र नारायण हेटे हे नाव कॉर्पोरेट विश्वात मोठे आहे. ते तब्बल 100 कंपन्यांमध्ये आजी-माजी संचालक किंवा भागीदार आहेत. त्यातील काही कंपन्या सक्रिय आहेत, तर काही 'स्ट्राईक ऑफ' किंवा 'इनॅक्टिव्ह' स्वरूपात आहेत. इतका मोठा व्यावसायिक अनुभव असलेली व्यक्ती एका भोंदू बाबाच्या संस्थेला अशा प्रकारे जमीन दान का करते आणि त्यामागे कोणते आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत, याचा शोध घेण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.

advertisement

सखोल चौकशीची मागणी

खरातच्या अब्जावधींच्या संपत्तीत हे 32 लाख रुपये म्हणजे समुद्रातील एका थेंबासारखे आहेत. मात्र हा प्रकार दाखवतो की पैशांचा खेळ कागदोपत्री कसा रचला जातो! हा संपूर्ण प्रकार अत्यंत संशयास्पद असून सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.बरेच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता देखील विजय कुंभार यांनी व्यक्त केली आहे. या नव्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी
सर्व पहा

8 महिला, 35 व्हिडीओ नीरज नाही तर 'या' व्यक्तीने समोर आणला भोंदू खरातचा चेहरा, फडणवीसांनी नावचं सांगितलं

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
16 लाखांच्या जमिनीची किंमत दोन तासात 32 लाखांवर, खरातच्या आश्रमाचा नवा कारनामा समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल