कोल्हापूरमध्ये पेट्रोलवर मोठे निर्बंध, पंपावर आता मिळणार फक्त 'इतक्या' रुपयांचं पेट्रोल; नियमावली लागू
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून इंधन बचतीसाठी उचललेले हे पाऊल भविष्यातील संकटाची चाहूल मानले जात आहे.
कोल्हापूर : इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे पडसाद आता थेट कोल्हापूरकरांच्या खिशावर आणि गाड्यांच्या इंधन टाक्यांवर उमटताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या कच्च्या तेलाच्या टंचाईची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने इंधन वितरणावर अत्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, इंधन बचतीसाठी उचललेले हे पाऊल आहे. मात्र फक्त एकावेळी किती पेट्रोल मिळणार यावर निर्बंध लावण्यात आले आहे.
इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू झालेल्या भीषण युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणारी इंधन टंचाई टाळण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात इंधन वितरणावर मर्यादा घालण्याचे आदेश दिले आहेत. 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने हे निर्बंध लागू करण्यात आले असून आगामी 31 मार्चपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.
advertisement
काय आहेत नवे निर्बंध?
- दुचाकी वाहने (Two Wheeler) : एका वेळी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतच पेट्रोल भरता येईल.
- तीनचाकी व चारचाकी वाहने (Foue wheeler) : एका वेळी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल.
- बाटलीत, कॅनमध्ये पेट्रोल देण्यास बंदी - सुरक्षेच्या कारणास्तव आणि साठेबाजी रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कॅन, प्लास्टिक बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास पेट्रोल पंपांना सक्त मनाई करण्यात आली आहे.
advertisement
31 मार्चपर्यंत निर्बंध
मध्य आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून पुरवठा मर्यादित होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि जीवनावश्यक सेवांना इंधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने हा मार्ग स्वीकारला आहे. 25 ते 31 मार्च या कालावधीत इंधन साठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
advertisement
पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकताच शहरातील आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी आपली टाकी फुल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. हे निर्बंध एका वेळी पेट्रोल भरण्यावर आहेत
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 7:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
कोल्हापूरमध्ये पेट्रोलवर मोठे निर्बंध, पंपावर आता मिळणार फक्त 'इतक्या' रुपयांचं पेट्रोल; नियमावली लागू





