advertisement

गुन्हेगारांशी उठबस, काळे धंद्याची इत्यंभूत माहिती; भोंदू खरातला नडणारा नाशिकचा पत्रकार बाळू तुपे आहे तरी कोण?

Last Updated:

जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात केलेल्या एका धक्कादायक आरोपाने जुने हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे

News18
News18
नाशिक : अशोक खरात प्रकरणावरुन दररोज नवनवे खुलासे होत असून अनेक प्रकरणं समोर येत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी अशोक खरात प्रकरणावर विधानसभेत गंभीर आरोप केले आहेत. खरातने पहिली हत्या 2007 मध्ये पत्रकार बाळू तुपेची केली असल्याचा आरोप केलाय.पोलिसांनी अशोक खरातला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात केलेल्या एका धक्कादायक आरोपाने जुने हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र स्थानिक पत्रकार बाळू तुपे नेमके होते तरी कोण याविषयी जाणून घेऊया.
बाळू तुपे हा नाशिकचा पत्रकार होते, विविध विषयांना ते हात घालत होते. पत्रकारिता करताना त्यांनी अशोक खरात विरोधात बातम्या छापल्या होत्या. मात्र, त्यानंतर खरातच्या समर्थकांनी बाळू तुपेशी संपर्क साधला होता, त्यांनतर ते प्रकरण मागे पडले होते. मात्र, बाळू तुपे जमिनीच्या व्यवहारात देखील असायचे, काही राजकीय नेत्यांच्या तो संपर्कात होते. बाळू तुपे यांचा खून होण्यामागे होर्डिंग्जचा वाद असल्याचे कारण सांगितले जात होते. तर काहीजण जागेच्या वादाची किनार असल्याचे सांगत आहेत.या प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल होता मात्र यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत.
advertisement

कोण आहेत बाळू तुपे?

  • नाशिकमधील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बाळू तुपे पत्रकार म्हणून करत होते काम
  • नाशिकच्या गुन्हेगारांसोबत होती त्याची उठबस
  • पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शहरातील अवैध धंद्यांवरून करायचा ब्लॅकमेल
नाशिक मधील एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये बाळू तुपे यांनी कॅप्टन खरात विरोधात 2005 सालात चालवली होती मालिका
  • याच दरम्यान बाळू तुपे या पत्रकाराची झाली होती हत्या
  • advertisement
  • नाशिकच्या स्टेट बँक परिसरात लावण्यात येणाऱ्या एका होर्डिंगवरून हत्या झाल्याचे दिले होते कारण
  • या बाळू तुपे या हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून कुणाल रोकडे, संदीप रोकडे, राकेश रोकडे, चंद्रकांत निकम, अमित बोरुडे , शकील अन्सारी, सागर पगारे, पवन जाधव या 8 जणांना करण्यात आलं होतं
  • मात्र न्यायालयाने या सर्वांची निर्दोष म्हणून केली मुक्तता
  • advertisement

    आव्हाडांचे आरोप बिनबुडांचे, नेमकं काय म्हणाले निर्दोष आरोपींचे नातेवाईक? 

    आता याच बाळू तुपे हत्या प्रकरणात कॅप्टन खरात याचा हात होता असा खळबळजनक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र निर्दोष सुटलेल्या आरोपींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात आमचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. आम्ही कोणत्याही कॅप्टन खरातला ओळखत नाही त्यावेळेला कॅप्टन खरात हे नाव कोणाला माहित देखील नव्हतं. बाळू तुपे यांच्या हत्या देखील आमचा संबंध नव्हता म्हणून आम्हाला न्यायालयाने निर्दोष सोडलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
    view comments
    मराठी बातम्या/महाराष्ट्र/
    गुन्हेगारांशी उठबस, काळे धंद्याची इत्यंभूत माहिती; भोंदू खरातला नडणारा नाशिकचा पत्रकार बाळू तुपे आहे तरी कोण?
    Next Article
    IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
    IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
    • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

    • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

    • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

    View All
    advertisement