Solapur News : क्षुल्लक वादातून कोयत्याचे सपासर वार, बस स्टँडसमोर भयानक थरार, हल्ल्याचा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
क्षुल्लक कारणावरून एकाने कोयत्याने सपासप वार करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत निलेश सुतार हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत क्षुल्लक कारणावरून एकाने कोयत्याने सपासप वार करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत निलेश सुतार हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे. तसेच या घटनेचा हादरवून टाकणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
सोलापूरच्या पांगरी येथील बस स्टँडसमोर ही घटना घडली आहे. खरं तर बस स्टँड समोर निलेश सुतार आणि इतर दोन जण होते. निलेश सुतार हे एकटे उभे असताना एक जण कोयता घेऊन येतो. या हल्लेखोराला रोखण्यासाठी एक जण मध्ये येतो. पण त्याचा काहीच फायदा होत नाही आणि अज्ञात व्यक्ती निलेश सुतारवर हल्ला करतात. या हल्ल्यात सुतार प्रतिकार करतात त्यानंतर अज्ञात पळ काढतो. पण या घटनेत ते गंभीर रित्या जखमी होतात. ही संपूर्ण घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
Solapur: क्षुल्लक वादातून कोयत्याचे सपासर वार pic.twitter.com/4jdHesSRy7
— VIRALबाबा (@viralmedia70) March 25, 2026
पांगरी येथे बस स्टँड समोर मजुरांना कामावर लावल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. या वादातून अनिकेत उर्फ दादा देशमुख याने कोयत्याने वार करत निलेश सुतार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.तसेच या दोघांमध्ये कोणता तरी जुना वाद देखील होता,याच वादातून ही घटना घडली होती. या घटनेत निलेश सुतार हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात अनिकेत उर्फ दादा देशमुख, शिवाजी उर्फ लाडू पवार या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 8:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News : क्षुल्लक वादातून कोयत्याचे सपासर वार, बस स्टँडसमोर भयानक थरार, हल्ल्याचा VIDEO








