TRENDING:

Ashok Kharat : अशोक खरातचा 'भाईगिरी' स्टाईलनं ताबा, स्वाध्याय परिवाराची कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न! नाशिकमध्ये खळबळ

Last Updated:

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, त्याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शिर्डीमध्ये खरातचा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, त्याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शिर्डीमध्ये खरातचा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा समोर आला आहे. खरातने आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आले आहे. विशेष म्हणजे ही जागा स्वाध्याय परिवाराच्या तत्वज्ञान विद्यापीठासाठी देण्यात आल्याची माहिती आहे.
अशोक खरातचा 'भाईगिरी' स्टाईलनं ताबा, स्वाध्याय परिवाराची कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न! नाशिकमध्ये खळबळ
अशोक खरातचा 'भाईगिरी' स्टाईलनं ताबा, स्वाध्याय परिवाराची कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न! नाशिकमध्ये खळबळ
advertisement

नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील त्याच्या 'तृप्तबाला' बंगल्याला लागून असलेल्या स्वाध्याय परिवाराच्या तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरातने चक्क अघोषित ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व बेकायदेशीर प्रकार उजेडात आला असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

४७७ वार भूखंडावर 'वक्रदृष्टी'

'दिव्य मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाने चार वर्षांपूर्वी स्वाध्याय परिवाराला आध्यात्मिक कार्यासाठी ४७७ वार भूखंड दान केला होता. या जागेवर सातबारा उताऱ्यावर तत्त्वज्ञान विद्यापीठाची अधिकृत नोंदही आहे. मात्र, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांनी या जागेचा वापर जणू काही ती त्यांची खासगी मालमत्ता असल्यासारखा सुरू केला आहे. भावफेरी आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी राखीव असलेल्या या भूखंडाला कुंपण घालून तेथे वृक्षारोपण करण्यात आले होते, ज्याचा गैरफायदा खरातने घेतल्याचे दिसत आहे.

advertisement

स्वाध्याय परिवाराचा संताप, SIT चौकशी होणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चंद्राचा कधीही न दिसणारा भाग, अचानक ब्लॅकआऊट अन् नासाचा संपर्क तुटला, 40 मिनिटांचा धरार, आर्टेमिस-2 मोहिमेत काय घडलं?
सर्व पहा

या प्रकाराबाबत स्वाध्याय परिवारातील ज्येष्ठ सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "ही जागा आमचीच आहे, खरातने कोणाच्या परवानगीने हा बेकायदेशीर ताबा मिळवला? त्याच्यावर कडक पोलीस कारवाई व्हायला हवी," अशी मागणी सदस्यांनी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरातच्या मालमत्तांची चौकशी करणाऱ्या 'एसआयटी' (SIT) कडे आता या जमिनीच्या गैरव्यवहाराचा तपासही सोपवला जाण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : अशोक खरातचा 'भाईगिरी' स्टाईलनं ताबा, स्वाध्याय परिवाराची कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न! नाशिकमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल