कॅप्टन अशोक खरात प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. नाशिकमध्ये एसआयटी कडून अशोक खरात आणि इतरांची कसून चौकशी सुरू आहे. त्याच वेळी या लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक प्रकरणात नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. करणी-बाधा अशा वेगवेगळ्या कारणांनी अशोक खरातकडून जवळपास १०० महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणाचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.
advertisement
पुजाऱ्याच्या चौकशीतून काय बाहेर येणार?
खरात याच्या फार्म हाऊसवर असलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्याची चौकशी हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या मंदिरात आणि फार्म हाऊसवर नक्की कोणत्या प्रकारचे व्यवहार किंवा 'कारनामे' चालत असत, याची इत्यंभूत माहिती या कर्मचाऱ्यांकडे असण्याची शक्यता SIT ला आहे.
फार्म हाऊसवरील गुपितांचा होणार उलगडा
अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर, त्याच्या फार्म हाऊसवर अनेक संशयास्पद हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. आता SIT च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील. "फार्म हाऊसवर कोण-कोण बडे लोक येत असत? तिथे छुप्या पद्धतीने काय चालत असे? आणि महिलांबाबतच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे का?" या प्रश्नांची उत्तरे या चौकशीतून मिळण्याची दाट शक्यता आहे.
