महिलांचे शोषण आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याने पोलीस कोठडीत धक्कादायक दावे केले आहेत. तपासादरम्यान अत्यंत उद्विग्न प्रतिक्रिया देताना त्याने स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. "मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता," असा अजब दावा खरातने पोलिसांसमोर केला आहे, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
advertisement
कोणी धोका दिला? खरातची हताश कबुली...
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान खरातने पूर्णपणे आध्यात्मिकतेचा बुरखा ओढण्याचा प्रयत्न केला. "माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे मी भले केले तेच आज माझ्यावर उलटले आहेत," असं म्हणत "यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार असल्याचे खरातने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, खरातच्या या दुष्कृत्याच्या प्रकरणाची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी (SIT) पथकाने गुरुवारी दुपारी खरातचे 'ओकस' कार्यालय सील केले. या कार्यालयातून फॉरेन्सिक पथकाने खडे, चिंचोके, काही तांत्रिक यंत्र, गंडेदोरे, ईशान्येश्वर मंदिराचा फोटो, उत्तेजक स्प्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय काही पुरावे जमा करण्यात आल्याची माहिती आहे.
