अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, " अशोक खरातला केवळ 'भोंदू' म्हणू नका, तो एक 'विकृत' माणूस आहे ज्याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
प्रसादात कफ सिरप आणि व्हायग्रा....
दमानिया यांनी खरातच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. "खरात हा कफ सिरपमध्ये 'व्हायग्रा' मिसळून 'ओशनो जल' तयार करायचा. हे जल घेण्यासाठी अनेक बडे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे. यामध्ये तिरुपती मंदिराचे ट्रस्टी आणि मुंबईतील एका बड्या डेप्युटी कलेक्टरचाही समावेश आहे," असा दावा त्यांनी केला. श्रीमंत लोकांना पैशांसाठी लुटले जायचे, तर मध्यमवर्गीय महिलांचे लैंगिक शोषण केले जायचे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
मंत्र-तंत्र आणि अंधश्रद्धेचा बाजार...
खरात 'ओशनो प्रे' आणि 'सिद्ध प्रे' नावाचे कार्यक्रम राबवायचा. यामध्ये ११ वेळा जप करायला सांगून शंकराच्या पिंडीवरील हंडा हलवून लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात असत. सिद्ध प्रेमध्ये लोकांना सापाचे आवाज ऐकू येणे किंवा आकृत्या दिसणे असे भास निर्माण केले जात होते. लोकांना एकप्रकारे संमोहित केले जायचे, अशी माहिती दमानिया यांनी दिली.
चाकणकर थर्ड क्लास बाई...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर दमानिया यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली. "चाकणकर या थर्ड क्लास बाई आहेत. २४ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्रातील महिलांनी रस्त्यावर उतरावे," असे आवाहन त्यांनी केले. तसेच सुनेत्रा पवार यांनी यात हस्तक्षेप करून चाकणकरांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
